इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहोशवा 19

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.
2आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;
3हसर-शुवाल व बाला व असेम;
4एल्तोलाद व बथूल व हर्मा;
5आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा;
6आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गावे;
7अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे;
8बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.
9शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.
10तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;
11त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.
12ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.
13तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;
14ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.
15कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.
16जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
17इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.
18त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;
19आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;
20रब्बीथ, किशोन व अबेस;
21रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,
22त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.
23इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
24पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
25त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
26अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
27ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.
28तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.
29तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.
30उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;
31आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
32सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
33त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
34तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
35त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
36अदामा, राम व हासोर;
37केदेश, एद्रई व एन-हासोर;
38इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.
39नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.
40सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.
41त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.
42शालब्बीन व अयालोन व इथला;
43एलोन व तिम्ना, एक्रोन;
44एलतके, गिब्बथोन व बालाथ;
45यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन.
46मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.
47दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले.
48दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.
49इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.
50परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला.
51एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.