इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यशया 29

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1अरीएल, अरीएल, म्हणजे ते शहर ज्यात दाविदाने तळ दिला, तिला हायहाय! वर्षाला वर्ष जोडा, सण फिरून येवोत.
2पण मी अरीएलला शिक्षा करीन आणि त्यामुळे ती दु:ख व शोक करील, आणि ती मला अरीएलासारखी होईल.
3मी तुझ्यासभोवती तळ घालून तुला वेढीन, आणि मी तुझ्याभोवती मजबूत कुंपण घालीन आणि तुझ्याविरूद्ध वेढा उभारीन.
4तू नीच केली जाशील आणि भूमीवरून बोलशील. तुझा आवाज धुळीतून कमी निघतील, तुझा आवाज भूमीतून बाहेर निघणाऱ्या भूतासारखा असेल, आणि तुझा शब्द धुळीतून आल्याप्रमाणे येईल.
5तुझ्या शत्रूंचा समुदाय धुळीच्या कणांसारखा आणि निर्दयांचा समुदाय उडत्या भुसासारखा होईल आणि हे एका क्षणांत एकाएकी घडणार.
6सेनाधीश परमेश्वराकडून, भूकंप, मोठीगर्जना व मोठे वादळ, वावटळ आणि खाऊन टाकणारी अग्नी, यांनी तुला शासन करण्यात येईल.
7ते सर्व रात्रीच्या आभासासारखे असेल, अनेक राष्ट्रातील समुदाय अरीएलविरूद्ध लढतील, ते तिच्यावर आणि तिच्या दुर्गावर हल्ला करतील.
8हे असे असणार की एक भुकेला मनुष्य आपण खात आहे असे स्वप्न पाहतो, पण जेव्हा तो जागा होतो तर त्याचे पोट रिकामेच असते. हे असे असणार की तान्हेला स्वप्न पाहतो की तो पीत आहे, पण तो जागा होतो आणि पाहा तो मूर्छित आहे व त्याचा जीव त्रासलेला आहे, होय, जे राष्ट्र समुदाय सियोन पर्वताविरूद्ध लढतात त्यांची अशीच स्थिती होईल.
9तुम्ही विस्मित व आश्चर्यचकित व्हा, तुम्ही आपणास आंधळे करा आणि आंधळे व्हा. ते धुंद आहेत पण द्राक्षरसाने नव्हे. ते झूलत आहेत पण मद्याने नव्हे.
10कारण परमेश्वराने तुम्हावर गाढ झोपेचा आत्मा ओतला आहे. त्याने तुमचे डोळे बंद केले आहेत, जे भविष्यवादी आहेत आणि परमेश्वर तुमची डोकी झाकले, जे तुम्ही दृष्टांत पाहता.
11तुम्हास सर्व दर्शन शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाच्या शब्दाप्रमाणे झाले आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्यास वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे.”
12किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”
13माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व मनुष्यांनी घालून दिलेले नियम आहेत.
14म्हणून मी शक्तीशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांस विस्मित करीत राहीन. आश्चर्या मागून आश्चर्य, त्यांच्यातील सुज्ञ मनुष्याचे ज्ञान नष्ट होईल, आणि त्यांच्यातील शहाण्या मनुष्याचा समजदारपणा नाहीसा होईल.
15जे परमेश्वरापासून आपल्या योजना खोल लपवतात, आणि ज्यांची कृत्ये अंधारात आहेत, व जे असे म्हणतात, “आम्हांला कोण पाहते? आणि ओळखते? त्यांना हायहाय!”
16तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? “तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही” असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय?
17काही काळाच्या आत लबानोन सुपीक भूमीमध्ये बदलण्यात येईल आणि सुपीक भूमी घनदाट जंगल होईल.
18त्या दिवशी बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल आणि आंधळ्याचे डोळे गडद अंधारातून पाहतील.
19पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.
20कारण निर्दयींचा अंत होईल आणि उपहास करणारा नाश होईल. दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे सर्व काढले जातील.
21जे मनुष्यांना शब्दाने खोटे पाडतात. ते त्याच्यासाठी पाश मांडतात जे वेशीत न्याय शोधतात आणि नीतिमानास खोटेपणानी दाबून टाकतात.
22परमेश्वर, ज्याने अब्राहामाला खंडून घेतले, परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी असे बोलतो. “याकोब यापूढे लज्जीत होणार नाही व त्याचे तोंड आता फिक्के पडणार नाही.
23पण जेव्हा तो त्याची सर्व मुले पाहील, जे माझ्या हातचे कार्य असेल, ते माझे नाव पवित्र मानतील. ते याकोबाचा पवित्र प्रभूला पवित्र मानतील; इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.
24जे भ्रांत आत्म्याचे ते बुद्धी पावतील आणि जे तक्रार करतात ते विद्या प्राप्त करतील.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.