इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 93

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
2तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस.
3हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
4खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
5तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.