इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

स्तोत्रसंहिता 29

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
2परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
3परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
4परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
5परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
7परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
8परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
9परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
10महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
11परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.