इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहोशवा 16

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते.
2मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.
3पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.
4याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शे व एफ्राइम यांना वतन मिळाले.
5एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती.
6आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली.
7नंतर ती यानोहा पासून अटारोथ शहर व नारा नगर येथपर्यंत उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.
8तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे.
9आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती;
10तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.