इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 23

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
2मानवाच्या मुला, दोन स्त्रिया एकाच आईच्या मुली होत्या.
3त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले.
4त्यांची नावे अहला थोरली व अहलीबा धाकटीचे नाव आहे, ते माझे झाले आहेत आणि त्यांनी पुत्राला व कन्येला जन्म दिला. त्यांच्या नावाचा अर्थ येणे प्रमाणे आहे. अहला म्हणजे, शोमरोन आणि ओहलीबा म्हणजे यरूशलेम.
5परंतू अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्या कर्म केले; तिच्या प्रियकरांशी ती वासनेने कामसक्त झाली होती, अश्शूरांच्या हाती ते सत्ता असलेले होते.
6राजधिकाऱ्याने जांभळी वस्त्रे परिधान केली होती. जे सर्व पुरुषात बलवान व देखणे होते, त्यातील सगळे घोड्यावर स्वार होऊन आले आहेत.
7तिने स्वत:ला वेश्याकामासाठी त्यांना सर्वात उत्तम अश्शूरी देऊन टाकले, तिने स्वत:ला काम संतप्तेने प्रत्येकासोबत स्वत:ला अशुद्ध केले, तिने मुर्तीसोबत तिने कामसंतप्त पणा केला.
8तिने मिसरात कुठलाही वेश्याकर्म मागे ठेवला नाही, जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्या सोबत झोपले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले त्यांनी पहिल्यांना तिच्या सोबत संभोग केला.
9यास्तव मी तिला तिच्या प्रियकरांच्या हाती दिले अश्शूर ज्यांनी तिच्याशी व्यभिचार केला.
10त्यांनी तिला नग्न केले. त्यांनी तिच्या मुला मुलींना नेऊन तलवारीने मारुन टाकले, ती स्त्रियांमध्ये निंदेचा विषय झाली, यामुळे तिचा न्याय निवाडा करण्यात आला.
11तिची बहिण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले.
12अश्शूरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार व सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला.
13मी पाहिले तिने स्वत:ला अपवित्र केले. त्या दोघी बहिणींनी एकसमान कार्य केले.
14मग तिने आपल्या व्यभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या. तिने भिंतीवर रेखाटलेले चित्र काढले, तिने खास्द्यांची लाल रंगाने आकृती रेखाटली.
15आपल्या कमेरेस बंद घालून रंगीबेरंगी फेटे घालून ते सर्व रथात खास्दी देशातील बाबेलाच्या अधिकाऱ्यासारखी दिसत असून आपल्या जन्मभूमित होती.
16जशी तिची नजर जाच्यावर गेली त्याच्याशी तिने व्यभिचार केला म्हणून तिने खास्द्यांच्या देशात निरोप्या पाठवला.
17मग बाबेल तिच्या पलंगावर जाऊन तिच्याशी व्यभिचार केला आणि त्याने तिच्याशी वेश्याकर्म केले व स्वत:ला अशुद्ध केले, तिने आपले मन त्याजवरुन दूर केले.
18तिने आपल्या व्यभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली, जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दूर झाले तसे तिच्या वरुन मन दूर झाले.
19मग तिने आपल्या व्यभिचाऱ्याच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत, तिला तिचे स्मरण होऊन तिने व्यभिचार अधिक वाढवला, जेव्हा तिने मिसरात आपला व्यभिचाराचा स्वभाव ठेवला.
20तेव्हा तिने आपल्या प्रियकरांशी व्यभिचार केला, ज्यांचे अवयव गाढवाच्या अवयवासारखे होते, व माज घोड्या सारखे होते.
21पुन्हा त्यांनी लज्जास्पद आपल्या तारुण्यात गैरवर्तन केले जेव्हा मिसऱ्यांनी तिचे स्तन गोंजारले.
22यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांस करीन.
23बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, व कोआ येथील लोक व अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री व सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन.
24ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, ढाली, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील.
25मी माझा राग त्यांच्यावर रोखीन मी त्वेषाने त्यांचा समाचार घेईन ते तुझे कान नाक कापून टाकतील, उरलेले तलवारीने पडतील, तुझ्या पुत्र कन्येला ते घेऊन जातील, व तुझ्या संतानाला अग्नी खाऊन टाकील.
26ते तुझे कपडे काढून टाकतील व दागिनेही घेऊन जातील.
27मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही.
28यास्तव परमेश्वर देव असे म्हणतो, पाहा! ज्यांचा तू द्वेष करतेस मी तुला त्यांच्या हाती देईन, ज्यांच्यावरुन तुझे मन दूर झाले त्यांच्या हाती मी तुला देईन.
29क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल.
30या सर्वकाही बाबी तुझ्या वेश्या कामासाठी केले जाईल तू मुर्तीसोबत राष्ट्रांना अशुद्ध केलेस.
31तू तुझ्या बहिणीच्या मार्गाने चाललीस, म्हणून मी शिक्षेचा प्याला तिच्या हाती सोपवून देईन.
32प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तू तुझ्या बहिणीचा प्याला पिणार आहेस, जो खोल व मोठा आहे, तू मस्करीचा व उपहासाचा विषय बनशील या प्याल्यात मोठा भरणा असेल.
33तू मद्यपानाने व दुःखाने भरली जाशील व भिती, धुळधाण हा प्याल्या शोमरोन तुझ्या बहिणीचा आहे.
34तू पिणार व नाल्यात रिकामे सोडशील, तुझे अनेक तुकडे केले जातील आणि तुझ्या स्तनांचे अनेक तुकडे केले जातील. असे मी जाहीर करतो, मी परमेश्वर देव जाहीर करत आहे.
35यास्तव प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, कारण तू मला विसरलास व मला मागे फेकून दिलेस तसेच स्वत:ला उंच करून आपला लाजीरवाणा जारकर्मी स्वभाव प्रकट केला.”
36परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू अहला आणि अहलीबा यांचा न्याय करशील काय? म्हणून त्यांना त्यांचे किळसवाणे मार्ग सादर कर,
37जेव्हापासून त्यांनी व्यभिचार मुर्तीसोबत केला व त्यांच्या संतानांना पुढे वारशाने दिला व पिऊन टाकणाऱ्या अग्नीसाठी भगदड पाडले.
38आणि त्यांनी सतत माझ्याशी असेच वर्तन ठेवले, त्यांनी माझे स्थान अपवित्र केले आणि त्याच दिवशी त्यांनी माझा शब्बाथात भेसळ केली.
39जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले.
40लांबून आलेल्या लोकांस तू बाहेर पाठवून दिले तू निरोप्याला पाठवलेस आता पाहा ते खरोखर येतील ज्यांची तू आंघोळ घालशील डोळ्यात अंजन घातलेस व दागीन्यांनी आपणास नटवीले.
41वेल बुट्टीदार पलंगावर आणि त्याज पुढे मेज मांडला व त्यावर सुगंधी द्रव्य व तेल मांडले.
42मग लोकांच्या गर्दीच्या आवाजात काळजी करणारे होते आणि रानातून मद्यपी, नालायक लोकांस जंगलातून आणण्यात आले. त्यांनी आपल्या हातात कडे घातले होते व मस्तकावर मुकुट घातला होता.
43मग मी त्यांना एक झिजून गेलेली व्यभिचाराच्या कृत्यांबद्दल सांगितले, ‘आता ते तिच्याशी व ती त्यांच्याशी जारकर्म करील.’
44ते जसे वेश्येकडे जातात तसे ते अहला व अहलीबा या दोषी वेश्येकडे गेले.
45पण धार्मिक लोक तिच्या व्यभिचारासाठी व रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील.
46प्रभू परमेश्वर म्हणतो, मी त्याजवर लोकसमुदाय आणून दहशत घालीन व ते आतंक, लुटमार करतील.
47मग लोकसमुदाय त्यांना धोंडमार करतील व तलवारीने त्यांचे तुकडे करतील, त्यांच्या मुलाबाळांना मारुन टाकतील व त्यांच्या घरांना जाळून टाकतील.
48मी भूमीतील लज्जास्पद स्वभाव काढून टाकीन व सर्व स्त्रियांना शिस्त लावीन यापुढे ते वेश्याकर्म करणार नाहीत.
49मग त्यांचे लज्जास्पद वर्तन तुझ्याविरुध्द करीन तू मुर्तीसोबत केलेल्या पापाचे फळ भोगशील मग यामार्गाने तुला कळेल मी परमेश्वर देव आहे.”
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.