इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

यहेज्केल 13

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि तो म्हणाला,
2मानवाच्या मुला इस्राएलाच्या भाकीत करणाऱ्या विरूद्ध भाकीत कर आणि जे आपल्या बुध्दीने भाकीत करतात त्यांना सांग, परमेश्वर देवाचा शब्द ऐका.
3प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मूर्ख संदेष्ट्यांबद्दल दिलगीरी आहे. जे आपल्या स्वतःच्या आत्म्याचे अनुसरण करतात, पण आपले दर्शन बघत नाही.
4हे इस्राएला, तुझे भाकीत करणारे उजाड नापीक भूमीत कोल्ह्यासारखे आहेत.
5तुम्ही इस्राएलाच्या घराण्यात वेशी पाडण्यास गेला नाहीत तर वेशी बांधून काढल्या नाही, परमेश्वर देवाच्या दिवशी युध्दात तुम्ही प्रतिकार केला नाही.
6लोकांस खोटा दृष्टांत आणि खोटे भाकीत कळले आहे, जो कोणी म्हणतो परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांस आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.
7तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला नाही का? आणि खोटे भाकीत केले नाही का? “तुम्ही म्हणता की अमुक तमुक परमेश्वर देव जाहीर करीत आहे” जेव्हा मी तसले काही बोललो नाही.
8यास्तव परमेश्वर देव असे सांगत आहेः कारण तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला आणि खोटी वार्ता केली यास्तव परमेश्वर देवाचा हा खोटा जाहीरनामा तुझ्या विरुध्द आहेः
9माझा हात जे खोटे भाकीत करणाऱ्यां विरुध्द आहे, आणि खोटे दर्शन बघणाऱ्यां विरुध्द आहे, ते लोक माझ्या लोकांच्या सभेत येणार नाहीत, त्यांच्या नावाची नोंदणी इस्राएलाच्या घराण्यात होणार नाही, ते इस्राएलाच्या भूमीत निश्चित जाणार नाहीत. मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे.
10यास्तव माझ्या लोकांस भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे. आणि त्यांना पांढरा रंग दिला आहेत.
11आणि म्हणतात की जो कोणी पांढरा रंग देईल त्यांना म्हणा वेशी पडतील; त्यांच्यावर मुसळ धार पाऊस पडून गारा पडून ते कोसळून जाईल व वादळाने उध्वस्त होईल.
12पाहा वेशी पडतील, इतर तुम्हास हे सांगणार नाही, “तुम्ही लावलेला पांढरा रंग कोठे आहे?”
13यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, माझ्या संतापामुळे मी वादळ घेऊन येईन, आणि माझ्या क्रोधामुळे पुर येईल; गारा पडल्यामुळे समुळ नाश होईल.
14तुम्ही पांढऱ्या रंगाने आच्छादलेली वेशी मी पाडून टाकेन त्यांना समुळ उध्वस्त त्यांच्या मध्य भागी मी करेन, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
15मी आपल्या रागाची परीसीमा पांढऱ्या रंगाच्या वेशीवर करेन, मी तुम्हास सांगेन; वेशी तेथे उभ्या नसणार व लोक त्यांना पांढरा रंगही लावणार नाही.
16इस्राएलाचे भाकित करणारे ज्यांनी यरूशलेमची भविष्यवाणी केली ज्यांनी तिच्या शांतीचा दृष्टांत पाहिला, पण तेथे शांती नाही. हे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.
17म्हणून मानवाच्या मुला आपले तोड लोकांच्या मुलींपासून फिरव जे आपल्या मनाचे भाकीत करतात, त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
18सांग, परमेश्वर देव हे म्हणतो; लोकांच्या जीवाची पारध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाश मांडून ठेवले आहेत, निरनिराळ्या मनुष्यांच्या उंचीच्या जाळ्या बनवतील तेव्हा तुम्ही हळहळ व्यक्त करून माझ्या लोकांच्या जीवाची शिकार करता, पण स्वतःला वाचवता.
19खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा अवमान केला आहे.
20यास्तव परमेश्वर देव म्हणतो, पाहा ज्या पक्षाच्या पारधासाठी पाश मांडला आहे त्यास तोडून मी मार्ग करीन,
21ज्या आत्म्यांची तुम्ही पक्षासारखे पारध केली त्यांना स्वतंत्र केले. तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.
22किंबहूना ज्या देवभीरुला मी खेदीत केले नाही. त्याचे हृदय असत्य बोलून दुःख देता व वाईट मार्गापासून परावृत होऊ नये, आणि आपल्या जीवाचा बचाव करु नये असे त्यांच्या बाहूंना बळ देता.
23म्हणून विनाकारण दर्शन बघणे व ज्योतिषी हे संपुष्टात येईल; मी आपले लोक तुमच्या हातून सोडवेन, तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.