इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (2019)

1 इतिहास 5

मराठीत बायबलचा हा अध्याय वाचा. Divine Threads चा मराठी अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.

1रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.
2यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते.
3इस्राएलाचा थोरला पुत्र रऊबेन याचे पुत्र हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी.
4योएलाचे वंशज हे होते: योएलाचा पुत्र शमाया होता. शमायाचा पुत्र गोग होता. गोगचा पुत्र शिमी होता.
5शिमीचा पुत्र मीखा होता. मीखाचा पुत्र राया होता. रायाचा पुत्र बाल होता.
6बालाचा पुत्र बैरा होता. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.
7योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या,
8योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते.
9फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती.
10शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.
11त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते.
12योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.
13त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात.
14हे अबीहाईलचे वंशज. अबीहाईल हूरीचा पुत्र. हूरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशा याचा पुत्र. यशीशाया यहदोचा पुत्र. यहदो बूजाचा पुत्र.
15अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
16ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते.
17यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती.
18मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.
19हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.
20आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगारी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला.
21त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.
22पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.
23बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
24मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते.
25पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला.
26इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांस कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Original edition and terms: eBible.org/mar. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0). Changes to this presentation: original HTML navigation, book introductions, editorial headings, footnotes and footnote popups have been omitted, and verse layout/whitespace normalized. Scripture wording itself is not rewritten. Combined source verse references, including Genesis 1:17–18, remain combined as in the original. The adapted Scripture presentation remains available under CC BY-SA 4.0; no source images are used and Bridge Connectivity Solutions does not necessarily endorse this presentation. Divine Threads चा मराठी बायबल अभ्यास लवकरच उपलब्ध होईल.